जळगाव : प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांचे या कारवाईचे पत्र त्यांना ६ तारखेला देण्यात आले आहे .
शहर आणि ग्रामीण भागातील महिला पदाधिकार्यांबद्दल घाणेरड्या भाषेतील पोस्ट सोशल मीडियावर टाकून त्यांची बदनामी देशमुख यांनी केली होती . खालच्या भाषेत त्यांच्याविषयी खोट्या तक्रारी करून त्यांना धमकावले होते . त्यानंतर देशमुख यांच्याविरोधात प्रदेश कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या . लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचेही निदर्शनास आले होते . विनोद देशमुख यांना ८ सप्टेंबर पर्यंत त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती . त्यांनी काहीच खुलासा न केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे .
यासंदर्भात विनोद देशमुख यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले कि आईच्या निधनामुळे मी जळगावात नाही आणि पक्षाच्या या निर्णयाची मला काहीही माहिती नाही .