मुंबई प्रतिनिधी । शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते २०१५ पासून समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आमदार विनायक मेटे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. या अनुषंगाने त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.