विनापरवाना नळाची जोडणी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे येथील एका ग्रामस्थांने मागील चार वर्षांपासून अनाधिकृत नळजोडणी करून पाण्याची चोरी केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

तालुक्यातील मेहूणबारे येथील नरेश रामराव साळूंके हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांनी २०१८ मध्ये ग्रामपंचायतीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता घरासमोर नळजोडणी करून घेतली. मागील चार वर्षांपासून तो सातत्याने पाण्याची चोरी करीत होता. मात्र सदर गंभीर बाब उघडकीस येताच ग्रामपंचायतीने प्रतिवर्ष ९०० रुपये प्रमाणे चार वर्षांचे ३ हजार सहाशे रुपयांचा कर आकारले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी पाण्याची चोरी केल्याच्या कारणावरून ग्रामसेवक राजेंद्र रमेश भालचंद्र यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आले आहे. सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content