विधीमंडळ हे तर ‘चोर मंडळ’ ! : राऊतांच्या वक्तव्याने वादंग

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधीमंडळ हे ‘चोर मंडळ’ असल्याची टिका खासदार संजय राऊत यांनी केल्याने वादंग निर्माण झाले असून त्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना वादग्रस्त वक्तव्य केले. विधीमंडळ हे तर ‘चोर मंडळ’ आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेना गट आणि भाजपवर निशाणा साधताना केलं आहे राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद विधीमंडळातही उमटले. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली. या मागणीला अनुमोदन देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनीही त्यांना अपशब्द वापरला. राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना अपशब्द वापरल्यानंतर ठाकरे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत गोगावलेंना सुनावले. या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला.

दरम्यान, या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केली.

Protected Content