मुंबई प्रतिनिधी । काँग्रेसने वाढीव जागेचा आग्रह सोडून दिल्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले असून यात भाजपला तीन; सेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर काँग्रेसला एक जागा मिळणार आहे.
आगामी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते. तथापि, काँग्रेसने ऐन वेळी एकाऐवजी दोन उमेदवार जाहीर केल्याने निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज सायंकाळी आपला पक्ष एकच जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. यामुळे आता ९ जागांमध्ये भाजपला चार जागा मिळणार आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळणार असून काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००