Home प्रशासन तहसील विधवेला अर्थसाहाय्याचा धनादेश

विधवेला अर्थसाहाय्याचा धनादेश


रावेर : प्रतिनिधी । तालुक्यातील खिर्डी येथील विधवा महिलेला कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत वीस हजार रुपयांचा धनादेश मंगळवारी तहसीलदार कार्यालयातर्फे देण्यात आला.

खिर्डी बुद्रुक येथील छायाबाई दीपक कोचुरे या महिलेला कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभ देण्यात आला असून २० हजार रुपयांचा धनादेश त्यांना आज निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व . संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एम. जे. खारे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.


Protected Content

Play sound