विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅप द्वारे करियर कल चाचणीची सुविधा

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांमध्ये करियरसाठी पुढे काय करावे याबद्दल कन्फ्युजन वाढत आहे. पुढील करियर बद्दल योग्य निर्णय घेता यावा यासाठी भुसावळ स्थित वेलनेस फाउंडेशनने अ‍ॅपद्वारे सायकोग्राफिक करिअर अॅप्टीट्यूड टेस्टची सुविधा दिली आहे त्यामुळे आता घर बसल्या करियर मध्ये पुढे काय करायचं? कोणती शाखा निवडायची याचा निर्णय सहज घेता येईल व आयुष्याला योग्य दिशा देता येईल.

ही टेस्ट मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत उपलब्ध असल्याने सर्वच माध्यमांमधील विद्यार्थ्यांसाठी खूप लाभदायक आहे. अ‍ॅप कसं वापरायचं याची स्टेप बाय स्टेप माहीत अ‍ॅप मध्ये दिली आहे. आजवर दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनि याचा लाभ घेतला आहे.

हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध असून त्याची लिंक खाली दिली आहे 👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.nilesh.aptitudetest

टेस्ट पूर्ण करायला 30 ते 40 मिनिट लागतात. टेस्ट नंतर गोंधळ दूर होऊन पाल्यांना कला, वाणिज्य, गृहविज्ञान, विज्ञान, मेडिसिन, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, वास्तुरचना शास्त्र, दृश्य कला, कृषि, सैनिकी, कायदा, व्यवस्थापन, पत्रकारिता अशा सुमारे 25 विद्या शाखांसाठी आवश्यक असलेल्या क्षमता व कौशल्यांची माहिती होते.

टेस्टचा रिपोर्ट हा 24 ते 48 तासात इमेलवरच किंवा व्हाट्सअप्पवर मिळतो. रिपोर्ट गृहीत धरून करियर बद्दल योग्य निर्णय व योग्य निवड करणे सोपे होते.

पारंपारिक कल चाचण्यांची चौकट, मर्यादा आणि क्लीष्टता मोडत करिअर अॅप्टीट्युड प्रो हे एक अगदी सोप्या स्वरूपाचे एकमात्र अॅप आहे. यात असलेले सायकोग्राफिक अल्गोरिदम हे या अ‍ॅप वैशिष्ट्य आहे.

भुसावळ शहरात वेलनेस फाउंडेशनच्या माध्यमातून नववी, दहावी, अकरावी, बारावी व इतर पदवी शाखांच्या विद्यार्थ्यांना ही क्षमता मापन चाचणी (अॅप्टिट्युड टेस्ट) देण्याची संधी उपलब्ध आहे. अत्यंत नाममात्र फी मध्ये आकारलेली आहे.

याविषयी अधिक माहितीसाठी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी निलेश गोरे यांच्याशी
(9922851678) संपर्क साधावा

निलेश गोरे
ट्रेनर व सायकोलोकजीकल काउंसलर
वेलनेस फाउंडेशन ,
नवशक्तीं आर्केड, भुसावळ
9922851678

Protected Content