कोल्हे शाळेत विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत (व्हिडिओ)

जळगाव, संदीप होले | येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात शासनाच्या सूचनेनुसार आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्यात आली. आज विद्यार्थिनीचे पुष्प गुच्छ व पुस्तके देवून स्वागत करण्यात आले.

 

मागील चौदा ते पंधरा महिन्यांपासून कोरोना  माहामारीमुळे सर्व जगच जणू थांबलेले होते. या काळात अनेकांनी संकटांना तोंड दिले. त्या काळात मुलांची सुद्धा आरोग्य संकटात आलेले होते. यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष शाळा सुरु न करता ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे सूचना केल्या होत्या. मात्र, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने शासनाने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.  इतक्या महिन्यांनी आज शाळा प्रत्यक्ष सुरू होणार म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच  शिक्षक व पालकांना सुद्धा उत्सुकता होती. आज काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे पुस्तके देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. जे. आर गोसावी यांनी शासनाच्या कोरोना विषयाच्या विविध सूचना व त्यांचे पालन कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगितली. शालेय नियोजन विषयी शाळेच्या नियमांविषयी पर्यवेक्षक एच. जी. काळे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक ए. व्ही. ठोसर, एस. डी. खडके, पुष्पा पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/574776677177147

Protected Content