जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात बिबट्याची मादी व दोन पिल्ले फिरत असल्याने त्यांना तातडीने पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी उपवन संरक्षकांकडे केली आहे.
खासदार उन्मेषदादा पाटील यांनी या संदर्भात उपवन संरक्षक विवेक हौशींग यांना लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरापासून बांभोरी परिसरात कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विस्तीर्ण परिसर आहे. हा परिसर मुळातच नैसर्गिक वृक्ष संपदेने बहरला आहे. गेल्या ८ ते १० दिवसापासून बिबट्याची मादी व त्याचे दोन पिल्ल यांचा वावर असल्याचे प्रसार माध्यमाद्वारे तसेच विद्यापीठाच्या पत्राद्वारे आम्हास कळले आहे.
त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच परिसराती रहिवासी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. तरी आपण आपल्या वनविभागाच्या मध्यामातून या परिसरात बिबट्या पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लाऊन तसेच पिंजरा लाऊन मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याची मदी व त्याचे दोन पिल्ल यांना पकडून त्यांची जंगलात रवानगी करण्यासंदर्भा तात्काळ तजवीज करण्यात यावी, असे या पत्रात नमूद केले आहे.