विद्यापीठात महात्मा फुले व्याख्यानमालेत कुलगुरू प्रा. निंबा ठाकरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, विचारधारा प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनी सोमवार २८ नोव्हेंबर रोजी आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेत प्रथम कुलगुरू प्रा. निंबा कृष्णा ठाकरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून याच समारंभात प्रा. ठाकरे यांचा दीर्घ कवितेचे प्रकाशन देखील होणार आहे.

महात्मा फुले स्मारक समिती, मुंबई यांनी दिलेल्या देणगीतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. सोमवारी विद्यापीठाच्या सिनेट सभागृहा सकाळी १०.३० वाजता प्रा. ठाकरे हे ‘महात्मा फुले आणि शिक्षण’ या विषयावर बोलणार असून कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात प्रा. ठाकरे यांच्या ‘ज्या वेळी तो ह्या मातीवर नसेल’ या दीर्घ कवितेचे प्रकाशन होणार आहे. परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील हे या दीर्घ कवितेवर भाष्य करणार आहेत. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांची उपस्थिती यावेळी राहील. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

Protected Content