विद्यापीठात शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवज्योत रॅलीचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवस्वराज्य दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोठ्या उत्साहात शिवज्योत रॅली काढण्यात आली.

 

विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग यांच्या पुढाकाराने आयोजित या शिवज्योत रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी व विद्यार्थिंनींनी उत्साहात सहभाग घेवून छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. ‍विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. या रॅलीचे विसर्जन मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ झाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. रा.से.यो.चे संचालक प्रा. सचिन नांद्रे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली. अक्षय महाजन या विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला. प्रा. दीपक सोनवणे यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. डॉ. नितीन बडगुजर यांनी आभार मानले. यावेळी प्रा.एस.टी. इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. के.एफ. पवार, प्रा. ए.एम. महाजन, सहसंचालक कार्यालयातील के.बी. दांडगे, जी.आर. वळवी तसेच सहायक कुलसचिव एन.जी. पाटील, विलास पाटील, कैलास औटी, रमेश पाटील, मच्छींद्र पाटील, अरूण सपकाळे, भिमराव तायडे, डॉ. विजय घोरपडे, संजय चव्हाण, नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, आकाश भामरे, अनुराग महाजन, विजय बिऱ्हाडे, गंजीधर पाटील आदी उपस्थित होते.

शिवस्वराज्य दिनानिमित्त विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीने प्रा. प्रतिभा अहिरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्री – पुरूष समता विषयक दृष्टीकोन’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव प्रा. के.एफ. पवार, विभागप्रमुख प्रा. अजय पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा. अनिल डोंगरे उपस्थित होते. डॉ. विजय घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. जगतराव धनगर यांनी परिचय करून दिला. डॉ. दीपक सोनवणे यांनी आभार मानले.

Protected Content