जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारा आयोजित मुलाखतींव्दारा चार विद्यार्थ्यांची मुंबई येथील युपीएल लिमिटेड कंपनीत निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारा विविध कंपन्यांच्या परिसर मुलाखतींचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना रोजगाराची सुविधा निर्माण करुन देण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेल्या मुलाखतींमध्ये स्कूल ऑफ केमिकल सायन्सेच्या एम.एस्सी. पेस्टीसाईडस् ॲण्ड ॲग्रोकेमिकल्स चे विश्वजीत चौधरी, नरेंद्र महाजन, नितेश राठोड आणि एम.एस्सी. ॲनालिटीकल केमिस्ट्रीचा सागर सोनवणे या चार विद्यार्थ्यांची युपीएल लिमिटेड कंपनीत निवड झाली आहे.
या परिसर मुलाखती आयोजनासाठी प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा, प्रा.अमरदीप पाटील, प्रा. रत्नमाला बेंद्रे यांनी व्यवस्थापन केले. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, समन्वययक डॉ.रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.