विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकीसाठी मंगळवारी मतमोजणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकीसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठातील कर्मचारी भवनात मतमोजणी होणार आहे. अशी माहिती माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी सोमवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळांसाठी रविवारी ८ जानेवारी रोजी शांततेत निवडणूक पार पडली. सरासरी ९७ टक्के मतदान झाले. अधिसभेच्या २२ आणि विद्यापरिषदेच्या ४ जागा तसेच १३ अभ्यासमंडळाच्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

मंगळवारी १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठातील कर्मचारी भवनात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी १० टेबल ठेवण्यात आले असून ५ टेबलावर प्रत्यक्ष मतमोजणी होईल. तत्पूर्वी सर्व मतपेट्या उघडल्यानंतर सरमिसळ करून प्राधिकरणानिहाय मतपत्रिका ठेवल्या जातील. वैध अवैध अशा मतपत्रिका निश्चित केल्यानंतर उमेदवाराला निवडून येण्याचा येण्यासाठीचा कोटा निश्चित केला जाईल. एका टेबलावर ५ ते ६ कर्मचारी प्रत्यक्ष मतमोजणी करतील. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी विद्यापीठाचे जवळपास १०० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार अथवा उमेदवाराने नियुक्त केलेला प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतरांना कर्मचारी भवनाच्या समोर शामियानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

 

Protected Content