जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारे व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा आणि संलग्नित महाविद्यालयातील एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडिया मार्ट कंपनीच्या आयोजित ऑनलाईन परिसर मुलाखतीमध्ये पाच विद्यार्थ्यांची एक्झिक्युटीव्ह पदासाठी निवड करण्यात आली आहे.
इंडिया मार्ट कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन टेस्ट व मुलाखतीमध्ये २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतील पुष्पराज पाटील, उमेश पाटील, सचिन चौधरी यांची तर एसएसबीटी महाविद्यालय बांभोरी येथील महेश पाटील व निखील मोरे अशा एकूण पाच विद्यार्थ्यांची निवड कंपनीकडून करण्यात आली. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना ३ ते ४ लाख रुपये दरम्यान वार्षिक वेतन कंपनीकडून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रशाळा संचालक मधुलिका सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे. या मुलाखतीं आयोजित करण्यासाठी समन्वयक प्रा.रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफीसर सोनाली दायमा यांनी व्यवस्थापन केले.