Home करियर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेचा अकरावा दिवस; वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परिक्षा

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेचा अकरावा दिवस; वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन परिक्षा


जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सद्या सुरू असलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान सद्या सुरु असलेल्या परीक्षेच्या अकाराव्या दिवशी दुपारी १.३० वाजेपर्यंत ९२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होत्या.

उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सूरू झाल्या आहेत. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करूनही अपरिहार्य कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत अशा सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार फक्त ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती यथावकाश कळविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील ऑनलाईन परीक्षा समन्वयकांशी संपर्क साधावा, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

दरम्यान सोमवारी परीक्षेचा अकरावा दिवस होता. दुपारपर्यंत विविध विद्याशाखांच्या ९२ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या परीक्षांच्या विविध सत्रात ३ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात ७५० विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षा सुरु होती.


Protected Content

Play sound