Home क्राईम विडी न दिल्याने हत्याराने वार !

विडी न दिल्याने हत्याराने वार !


चोपडा : प्रतिनिधी । विडी दिली नाही म्हणून एकावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना तालुक्यातील बुधगाव येथे घडली. एकावर चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधगाव येथील रहिवाशी फिर्यादी ज्ञानेश्वर भिमराव शिरसाठ (वय-४५) मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गावातील संशयित आरोपी नानाभाऊ रामसिंग भिल (वय-३५) याला विडी पिण्याचे व्यसन आहे. २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकानावर विडी घेण्यासाठी जात असतांना रस्त्यावर ज्ञानेश्वर शिरसाठ हा भेटला. ज्ञानेश्वरला विडी मागितली असता आपल्या विडी नसल्याचे सागितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी नानाभाऊ भिल याने शिवीगाळ करून कमरेला लावलेल्या तिक्ष्ण हत्याने ज्ञानेश्वरच्या मानेवर वार करून गंभीर जखमी केले. चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि ए.डी.वसावे करीत आहे.


Protected Content

Play sound