Home क्राईम विठ्ठल पेठेतून ३५ वर्षीय तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता; शनीपेठ पोलीसात नोंद

विठ्ठल पेठेतून ३५ वर्षीय तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता; शनीपेठ पोलीसात नोंद


जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुने जळगावातील विठ्ठल पेठ गॅरेज मेकॅनिकचे काम करणार ३५ वर्षीय तरूण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. शोधाशोध करून मिळून न आल्याने आज १५ डिसेंबर रोजी सकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, मधुकर भास्कर महाजन (वय-३५) रा. बदाम गल्ली, विठ्ठलपेठ जुने जळगाव हा गॅरेजवर मेकॅनिकचे काम करतो. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून गॅरेजवर काम करतो. १३ डिसेंबररोजी सकाळी ६ वाजता बाहेर जावून येतो असे सांगून घरातून मधुकर महाजन निघाला. मात्र अद्यापपर्यंत घरी न अल्याने वडील भास्कर विठ्ठल महाजन यांनी नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडे शोधाशोध सुरू केली परंतू आढळून आला नाही. वडील भास्कर महाजन यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound