पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करतांना संघटनेचे अध्यक्ष सुनिल देवरे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पारोळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे, ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास जातांना दिसत असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हवालदिल झाला आहे. एवढा खर्च करून आता उत्पन्न येण्यास सुरुवात झाली होती पण सर्व तालुक्यात नुकसान झालेले आहे आणि यावर सर्व तालुक्याचा सरसकट पंचनामा करावा अशी अपेक्षा असतांना शासनस्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही. हे असा अन्याय जर होत असेल तर शेतकऱ्यांनी संघटीत झाले पाहिजे असे सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विनोद चौधरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी शाखा अध्यक्ष आनंदराव पाटील व शाखा कार्यकारणी उपस्थित होती याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली.
शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून वसंत प्रकाश पाटील,कार्याध्यक्ष म्हणून बाळू रामभाऊ पाटील,उपाध्यक्ष म्हणून प्रदिप मदन पाटील,सचिव म्हणून नगराज पंडित पाटील, महासचिव म्हणून दिनेश विलास पाटील,खजिनदार म्हणून आनंदा नाना पाटील,आरोग्य प्रमुख म्हणून संजय भिला पाटील यांची निवड करण्यात आली.
गावाचे पोलिस पाटील आत्माराम सोनवणे, विटनेर ग्रा.प.सदस्य डॉ.विनोद चौधरी, माजी सरपंच नंदकिशोर पाटील, माजी ग्रा.प सदस्य नितीन पाटील, ग्रा.प सदस्य बाळू पाटील, ग्रा.प.सदस्य प्रदीप मदन पाटील, ग्रा.प.सदस्य शांताराम पाटील, माजी पो.पा.ईश्वर पाटील, प्रकाश मोहन पवार, रामचंद्र पाटील, आबा पाटील, रामभाऊ पाटील, बंडू धनगर, आनंदा पाटील, संजय पाटील, संजय पाटील, नगराज पाटील, अविनाश पाटील,गणेश पाटील, वसंत पवार, तुकाराम पाटील, नाना पाटील, आबा पाटील, दिनेश पाटील, संजय पाटील, उमेश सोनवणे, भूषण पवार, रामसिंग पवार, हर्षल पाटील आदी सह असंख्य कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हर्षल पाटील यांनी मानले.