पारोळा प्रतिनिधी | तालुक्यातील विटनेर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय, शहादा येथील कृषीदूत मनीष सुनील पाटील यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांची माहिती देवून मार्गदर्शन केले.
कृषीदूत मनीष पाटील यांनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षण, बीजप्रक्रिया, निंबोळीपासून फवारणी करिता निंबोळी अर्क, शेतीसाठी उपयुक्त ॲप्लिकेशन व इतर तांत्रिक बाबींची माहिती दिली. हवामानाचा अंदाज,पाणी,खतांचे व्यवस्थापन या सर्व बाबींचे शेतीसाठी महत्त्व आहे. त्या दृष्टीने काम केले पाहिजे असे शेतकऱ्यांना सांगितले. कार्यक्रमात शिवाजी झिपरू पाटील, मंगलसिंग शिवाजी पाटील, जितेंद्र ईश्वर पाटील, शरद प्रताप पाटील, वसंत पाटील व इतर शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.