जामनेर प्रतिनिधी ।तालुक्यातील मोयखेडा दिगर ४० वर्षीय शेतकर्याचा शेतात पाणी देत असताना.विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की समाधान श्रावण सपकाळे (वय ४०) हे गावातीलच नफ्याने करायला घेतलेल्या शेतात गहू पेरलेला असल्याने काल रात्री गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दरम्यान विजेचा पंप चालू किंवा बंद करण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळ झाली तरी समाधान सपकाळे शेतातून घरी का नाही आले.म्हणून घरच्यांनी शेतात जावून पाहिले असता ते मृत अवस्थेत दिसले.त्यांचा म्रुतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तरुण शेतकर्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.समाधान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई,दोन भाऊ,दोन बहीणी असा परिवार आहे.