Home Cities रावेर विजय पवार यांना महात्मा जोतीराव फुले शिक्षक गौरव पुरस्कार

विजय पवार यांना महात्मा जोतीराव फुले शिक्षक गौरव पुरस्कार

0
45

रावेर प्रतिनिधी । डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद , जळगाव च्या वतीने पंचायत समिती रावेरचे गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांना महात्मा जोतीराव फुले शिक्षक गौरव पुरस्काराने आज गौरवान्वित करण्यात आले.

विजय पवार यांना हा पुरस्कार कुलगुरू डॉ पी. पी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, शिक्षक नेते हणमंतराव पवार, डॉ विलास पाटील, राम पवार, विनोद पाटील, राकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिति होती. या पुरस्काराबद्दल जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, मुख्याध्यापक संघ जिल्हा अध्यक्ष जे. के. पाटील, ग. स. संचालक तुकाराम बोरोले, केंद्र प्रमुख हरीश बोंडे, भुसावळ पतपेढी संचालक सुरेश इंगळे यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound