जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी विजयादशमी निमित्ताने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता जळगाव शहरातील रिंगरोड परिसरासह इतर तब्बल आठ ठिकानाहून विविध भागातील नियोजित मार्गावर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवक सदंड पथसंचलन करून विजयादशमी उत्सव व पथसंचालन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचे राज्य संपर्कप्रमुख किशोर सूर्यवंशी, छत्रपती संभाजी नगर देवगिरी प्रांताचे सह संपर्कप्रमुख ऍड.अमरजीतसिंग गिरासे यांच्यासह जळगाव शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य यांनी सकाळी ७ वाजता रिंगरोडवरील गोकुळ स्वीट मार्ट जवळील चौकात एकत्रित येऊन सामूहिक शपथ घेतली.
घोषांच्या तालावर हे पथसंचलन करण्यात आले. संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रातील प्रमुख अतिथी विविध मार्गातील पथसंचालनात सहभागी झाले. त्यानंतर मण्यार लॉ कॉलेज मागे असलेल्या बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात सकाळी 8 वाजता उत्सव साजरा करण्यात आला.