विकास दुबे एन्काऊंटर : उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे : संजय राऊत

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याची प्रतिमा धुळीस मिळाल्यानंतर अशी कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थन केले नाही तरी पोलिसांचे खच्चीकरण होईल अशी भूमिका राजकीय पक्षाने घेऊ नये. बिहार, उत्तर प्रदेशात तर सब हमाम मै नंगे अशी परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

 

संजय राऊत यावेळी पुढे म्हणाले की, विकास दुबेला एक पक्ष विधानसभेचे तिकीट देणार होते.. पण तो सरेंडर झाला नाही म्हणून मिळाले नाही. हा उत्तर प्रदेश किंवा योगींचा प्रश्न नाही. देशाच्या कोणत्याही राज्यात असे झाले तर पोलीस त्याला जिवंत सोडणार नाहीत. पोलीस आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला नेहमी घेतं. जे झाले त्याचे राजकारण होता कामा नये. परंतु पोलिसांनी हा घेतलेला सूड असल्याचे राऊत म्हणाले. मोठी नावं बाहेर येऊ नयेत यासाठी विकास दुबेला ठार केल्याच्या आरोपावर बोलताना संजय राऊत यांनी, मला असं वाटत नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला हा सूड आहे असे म्हटले. विकास दुबेसारखी लोकं निवडणुका जिंकण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी काही राज्यात पोलीस, राजकारणी तयार करतात. विकास दुबेही अनेक पक्षांशी संबंधित होता. याला राजकारण जबाबदार आहे. आधी राजकारणी गुन्हेगारांचा वापर करुन घेत होते. आता गुन्हेगार राजकारणात येत आहेत. गुन्हेगारीचं राजकारण होणं धोकादायक आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Protected Content