विकासाच्या छातीत तीन तर हातातून निघाली एक गोळी ; डॉक्टरांची माहिती

 

कानपूर (वृत्तसंस्था) कुख्यात गुंड विकास दुबेचे एन्काऊंटरनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. कानपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी विकासला चार गोळ्या लागल्या असून त्यात छातीला तीन तर हाताला एक गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे.

 

डॉक्टरांनी सांगितले की, विकास दुबेला मृतावस्थेतच हॅलट रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांना त्याच्या शरिरात चार गोळ्या सापडल्या. यापैकी तीन गोळ्या त्याच्या छातीत तर एक गोळी त्याच्या हाताला लागली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी एन्काऊंटरनंतर पोलिसांनी सांगितले होते, की विकास दुबे पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जात असतांना त्याला रोखण्यासाठी गोळी चालवावी लागली. यावेळी त्याच्या कमरेवर गोळी लागल्याचेही पोलिसांनी सांगीतले होते. मात्र, जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या छातीत लागल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content