वाहन चालकाला रस्त्यात अडवत मारहाण करून मोबाईल लांबवला

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पिंप्राळा येथील आठवडे बाजारात वाहन चालकाला रस्ता अडवून मारहाण करत त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील दादावाडी परिसरात वृंदावन पार्क येथे लखीचंद वामन बडगुजर वय 56 वास्तव्यास आहेत. ते शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील आठवडे बाजार परिसरातून जात असताना तीन ते चार जणांनी त्यांना अडवले त्यानंतर चापटा बुक त्यांनी मारहाण करून लकीचंद बडगुजर यांच्या खिशातील मोबाईल जबरीने हिसकावून घेत चोरटे पसार झाले. याप्रकरणी लक्षण बडगुजर यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार संशयित निष्पन्न केले आहेत. ते सर्व झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तीन जण फरार असून तुफान रघु रिखीयासन वय २० यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Protected Content