Home Cities चाळीसगाव वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त चाळीसगावात मोहीम

वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त चाळीसगावात मोहीम

0
36

चाळीसगाव प्रतिनिधी । वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरासह तालुक्यात वाहतूक शाखेतर्फे धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतर्फे सध्या वाहतूक सुरक्षा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे. या निमित्त धडक मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. विशेष करून दुचाकी विना हेल्मेट चालविणारे चालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती येथील वाहतूक पोलीस शाखेतर्फे देण्यात आली आहे. याशिवाय विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, विना परवाना दुचाकी चालवणे, गाडीची कागदपत्रे सोबत नसणे आदी कारणांसाठीही कारवाई करण्यात येणार असल्याचेही वाहतूक शाखेने एका पत्रकान्वये कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound