भडगाव , प्रतिनिधी । तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर महसूल विभागाने कार्यवाही केली असून दोन ट्रॅक्टर वाहनांच्या चालक मालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१ नोव्हेंबर रोजी रात्री च्या सुमारास तालुक्यातील वाक शिवारातील गिरणा नदी पत्रात एम. एच. २० – सी. टी. ४३२१, एम. एच.१९- सी. टी. ६८२८ हे दोन वाहने अवैध वाळू वाहतुक विरोधी पथकास वाळू भरतांना मिळून आले. त्यांच्याकडून ३५०० शे रुपये किंमतीची १ ब्रास वाळू मिळून आली असून वडजी तलाठी विलास पांडुरंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गु र नं २९९/२०२० भा द वी कलम ३७९ प्रमाणे पहिले ट्रॅक्टर चालक वाल्मिक आनंदा पाटील व दुसरे वाहन चालक मालक संजय सुरेश त्रिभुवन दोघे राहणार वाक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी प्रभारी ठाणे अंमलदार आनंद पठारे यांनी भेट दिली असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहे.