जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू वाहतुकीस विरोध केल्याच्या कारणावरुन लमांजन येथील उपसरपंचांना वाळुमाफियांनी मारहाण केल्याची घटना सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कुऱ्हाळदे शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. यावेळी वाळुमाफियापैकी एकाने उपसरपंचाच्या डोक्यात फावडी टाकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून मुजोर वाळुमाफियांवर कारवाईची मागणी होत आहे..
कुऱ्हाळदे शिवारातून अवैध वाळू वाहतुक होत होती. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास लमांजन येथील उपसरपंच रतीलाल जयराम सोनवणे हे घटनास्थळावर गेले. तसेच ट्रॅक्टरमध्ये रेती कार भरता असे विचारले असता, याचा राग आल्याने ट्रॅक्टरवरील तिघांनी उपसरपंच सोनवणे यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी माहराण केली. तिघापैकी एकाने उपसरपंच सोनवणे यांच्या डोक्यात फावडा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच तुला काय करायचे ते कर, तुला आज जीवंत ठेवणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपसरपंच सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तीन जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून वाळुमाफियांवर कारवाईची मागणी होत आहे