Home Cities अमळनेर वाळूमाफियांची मुजोरी; तलाठ्यासह सहकाऱ्यांना मारहाण

वाळूमाफियांची मुजोरी; तलाठ्यासह सहकाऱ्यांना मारहाण


अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गंगापूरी शिवारातील तापी नदीच्या पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक्टर चालकांनी कारवाई करणाऱ्या तलाठ्यासह सहकाऱ्यांना मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमळनेर पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील गंगापूरी शिवारातील तापी नदीतून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती २२ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता तलाठी गणेश राजाराम महाजन यांनी मिळाली. त्यानुसार तलाठी महाजन हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. १२.३० ते १.३० वाजेच्या दरम्यान कारवाईसाठी आलेल्या तलाठीसह सहकाऱ्यांना ट्रक्टर चालका जगन पावरा (पुर्ण नाव माहित नाही), धिरज प्रभाकर धनगर दोन्ही रा.बुधगाव, महेश ज्ञानदेव पवार, अतुल ज्ञानेश्वर पवार दोन्ही रा. अनावर्दे ता. चोपडा यांनी चौघांनी तलाठी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांचा पाठलाग केला असता तिन ट्रकर वाळूने भरून पळ काढला. तलाठी गणेश महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे. 


Protected Content

Play sound