जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर शहर पोलीसांनी पकडले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातून वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. वाळूची चोरटी वाहतूक होत असल्यामुळे शहरात अनेक लहानमोठे अपघात होत आहे. दरम्यान मंगळवारी ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ शहर पोलीसांनी वाळूची चोरटी वाहतूक करतांना डंपर पकडले. डंपर चालक दगडू इकबाल शहा रा. खेडी खुर्द फुफनगरी, जळगाव याच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. जळगाव शहर पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर ताब्यात घेतले. याप्रकरणी पोहेकॉ भास्कर ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी ५ एप्रिल रोजी रात्री १ वाजता डंपर चालक दगडू इकबाल शहा रा. खेडी खुर्द फुफनगरी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.