वारीस पठाणचा शीरच्छेद करणाऱ्याला ११ लाखांचे इनाम

Waris Pathan

 

मुजफ्फरपूर (वृत्तसंस्था) वादग्रस्त वक्तव्य करणरे एमआयएमचे वारीस पठाण यांचा शीरच्छेद करणाऱ्याला आम्ही ११ लाखांचे इनाम देऊ, अशी घोषणा ‘हक-ए-हिंदुस्थान मोर्चा’ या मुस्लीम संघटनेने केली आहे.

 

गुलबर्गा येथील सभेत बोलताना वारीस पठाण यांनी १०० कोटीवर १५ कोटी भारी पडतील,असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर पठाण यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. आता मुजफ्फरपूर, येथील कंपनी बाग रोडवरच्या हक-ए-हिंदुस्थान मोर्चा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारीस पठाण यांचा पुतळाही जाळला. तसेच वारीस पठाण यांच्या तोंडी देशद्रोह्यांची आणि पाकिस्तानाची भाषा आहे. ही बाब आम्ही कधीही सहन करणार नाही. वारीस पठाण देशद्रोही आहेत, असेही ‘हक-ए-हिंदुस्थान’च्या राष्ट्रीय संयोजक तमन्ना हाश्मी यांनी म्हटले आहे.

Protected Content