पाळधी, ता. धरणगाव अलीम देशमुख । अखिल भारतीय वारकरी महामंडळ आयोजित विचार विनिमय सभेस आज सकाळी टाळ मृदंगच्या गजरात प्रारंभ करण्यात आला. यात पालकमंत्री सुद्धा वारकरी म्हणून सहभागी झालेत.
याबाबत वृत्त असे की, पाळधी येथे आज अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे नियुक्तीपत्रे प्रदान आणि विचार विनिमय सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभली आहे. या सभेच्या प्रारंभी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील हे स्वतः एक वारकरी म्हणून यात सहभागी झाले. विशेष म्हणजे यात पालकमंत्री गुलाबराव पाटील हे टाळ घेऊन सहभागी झाले.