यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात राविवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहीती कृषी विभागाच्या सुत्राकडुन प्राप्त झाली आहे.
२९ मेच्या रात्री १२.३० वाजे पासुन रात्री ३ वाजेपर्यंत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे यावल तालुक्यातील मारूळ, बोरखेडा बु॥, परसाडे, कोळवद, वड्री, मोहराळा , कोरपावली, महेलखेडी ,आडगाव , कासारखेडा व डोंगर कठोरा या परिसरातील सुमारे १९५ हेक्टर वरील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहीती प्रभारी यावल तालुका कृषी अधिकारी पी.आर. कोळी यांनी दिली आहे. या संदर्भात त्वरीत केळी पिकांचे पाहणी पंचनामे करण्याच्या सुचना ११ कृषी सहाय्यकांना देण्यात आल्या आहेत. राज्यशासनाने तात्काळ या वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे पंचनामे करून ,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .