Home क्राईम वाघ नगरातील विवाहितेचा पाच लाखासाठी छळ; पतीविरोधात गुन्हा दाखल

वाघ नगरातील विवाहितेचा पाच लाखासाठी छळ; पतीविरोधात गुन्हा दाखल

0
33


 

जळगाव प्रतिनिधी । व्यवसायासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी शहरातील वाघ नगर येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी ता. शिरपूर येथील पती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वाघ नगर येथील माहेर असलेल्या पुजा उमेश दुसाने (वय-२५) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील तऱ्हाडी ता. शिरपूर येथील उमेश सोमनाथ दुसाने यांच्याशी एप्रिल २०१४ मध्ये विवाह झाला आहे. सुरूवातीचे सहा महिने चांगले गेले. त्यानंतर लग्नात हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. पैश्यांची मागणी पुर्ण न झाल्याने पती उमेश दुसाने याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. हा शारिरीक व मानसिक छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगावला माहेरी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात पती उमेश दुसाने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound