वाघळी येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता!

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथील भामरे रोड येथून १८ वर्षीय तरुणी घरात कोणाला काही एक न सांगता घरातून बाहेर पडल्यानंतर ती घरी न परतल्याने शोधाशोध केली असता मिळून न आल्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दाखल केली.

अधिक माहिती अशी की, रूपाली किसन चितोडिया (नावात बदल) (वय- १८ रा. वाघळी ता. चाळीसगाव)हि आपल्या आईवडिलांसह वरील ठिकाणी वास्तव्यास आहेत. दि.१ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास रूपाली राहत्या घरातून  कोणाला काही न सांगता कोठेतरी गेली. परंतु ती घरी न परतल्याने घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र ती मिळून न आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आई चंद्रीबाई किसन चितोडिया हिने ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद आज दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास गोवर्धन बोरसे हे करीत आहेत.

 

Protected Content