*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील वाघळी गावात बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल स्वतः जवळ बाळगल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता जिवंत काडतुसासह तरूणाला अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोउनि लोकेश पवार यांना सोमवार रोजी गुप्त माहिती मिळाली की, तालुक्यातील वाघळी गावात जुन्या चांभार्डी रोडलगत बेघर वस्तीमध्ये बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल व जिवंत काडतुस एकाने स्वतः जवळ बाळगल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावर पोना गोवर्धन बोरसे, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोना जयंत सपकाळे अशांनी सदर ठिकाणी छापा टाकून गावटी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतूस असे एकूण २६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आकाश अमृत शिरसाठ (वय २८) रा. वाघळी ता. चाळीसगाव असे अटक केलेल्या आरोपी तरूणाचा नाव आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोउनि लोकेश पवार, पोना गोवर्धन बोरसे, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोना जयंत सपकाळे अशांनी केली आहे. पोना जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण व पोना शांताराम पवार हे करीत आहेत.