यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा वनक्षेत्रातून सागवान वृक्षांची बेकायद्याशीर कत्तल करून वाहतूक करणाऱ्यांना परवानगी पास विचारण्यास गेलेल्या वनरक्षकासह एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा आंबापाणी राखीव वनक्षेत्र येथे मुख्यालयात कार्यरत असलेले वनरक्षक राकेश सुभाष निकुंभे वाघझीरा हे उतर यावल पाश्चिम वनक्षेत्र वाघझिरा नाक्यावर कार्यरत असतांना सोमवारी १८ मे रोजी सायंकाळी १६.१५ वाजेच्या सुमारास संयशीत आरोपी लकडू ईश्वर बारेला हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर सागवानचे कटाई केलेले लाकुड घेवून जात असतांना वनरक्षक राकेश निकुंभे यांनी वाहतूकीचा परवाना विचारल्याचा राग आल्याने मोटारसायकलवरील व्यक्तीने यांना उद्देशून म्हणाला ‘आजपर्यंत कुणाचीही मला पास मागण्याची हिंमत झाली नाही, आज तुला दाखवतो’ असे म्हणुन कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकांची शर्टची कॉलर पकडुन शिवीगाळ करून त्यांच्या सोबत असलेले साक्षीदार यांना ईश्वर लकडु बारेला, गज्या हरासिंग पावरा, लकडु चैनसिंग बारेला, भगवान चैनसिंग बारेला व त्यांची आई नांव माहीत नाही या सर्व सहा लोकांनी मिळुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. राकेश निकुंभे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल तायडे करीत आहे.