वाकोद येथे शेत मजुराला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ; सात जणांविरूध्द गुन्हा

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाकोद मजुराच्या मालकाला शिवीगाळ करीत मालक कोठे अशी विचारणा केली. मालक घरी असे मजुरांने सांगताच संबधितांना राग आल्याने मजुराला शेतात मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी पहूर पोलीसात सात जणांना विरूद्ध अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकोद शिवारातील जय पांढरे यांच्या शेतात पत्र्याचे शेड काम सुरू आहे. याठिकाणी मजुर संजय आनंदा निकाळजे  केलेल्या सिमेंट कामावर पाणी मारत होता. यादरम्यान शेताच्या बांधा वरील लिंबाच्या झाडाखाली   गजानन शर्मा व विशाल शर्मा यांच्या सह तिन पुरुष व दोन महिला जेवन करीत होते. यांना  संजय निकाळजे आढळला.संबधितांनी संजयला बोलावून मालक कोठे विचारणा केली. संजय कडून समाधान कारक उत्तर न मिळाल्याने  संबधीतांनी मालक जय पांढरे यांना शिविगाळ केली.संजयने त्यांना विरोध केला. याचा राग आल्याने  संबधितांकडून  जातीय वाचक शिवीगाळ करून मारहाण केली. असे  संजय आनंदा  निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादी त म्हटले आहे. त्यानुसार सागर गजानन शर्मा, विशाल गजानन शर्मा,राजेश राम प्रसाद शर्मा, सोनू श्यामप्रसाद शर्मा, मयुर रामप्रसाद शर्मा, संतोषी राम प्रसाद शर्मा,मंगला राम प्रसाद शर्मा यांच्या विरूद्ध अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास  पाचोरा विभागाचे डिवाय एस.पी. भरत काकडे करीत आहे.

Protected Content