जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागातून वाकडी येथील पती-पत्नीसह मुलाला लोखंडी आसारी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील वाकडी येथे मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे लक्ष्मण शांताराम पाटील हे वास्तव्यास आहे. मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते घराजवळील खळ्यात म्हशीचे दूध काढत असतांना त्यांच्या पत्नी सुनंदाबाई यांना गावातील गुलाब भारत पाटील, ज्ञानेश्वर भारत पाटील व भारत शांताराम पाटील हे तिघ मारहाण करीत होते. पत्नीला मारहाण करीत असल्याचे बघताच लक्ष्मण पाटील हे त्याठिकाणी गेले. त्यांनी पत्नीला वाचवित तीला मारहाण का करता याबाबत विचारणा केली असता, तिघांनी दम देत “तुम्ही आमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली” असल्याचे सांगितले. त्यानंतर लक्ष्मण पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली. याचवेळी त्यांचा मुलगा अजय हा तेथे आला असता त्याला देखील लोखंडी आसारीसह लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. दरम्यान, तिघांना गावातील काही नागरिकांनी वाचवित वादावर पडदा टाकला. त्यानंतर तिघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता शांताराम पाटील यांच्या तक्रारीवरुन तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.