मुंबई (वृत्तसंस्था) पालघरमध्ये साधूच्या वेशात मुलांना पळवणारी टोळी फिरतेय असा मॅसेज पसरवणारे कोण? पालघर घटनेनंतरही राज्यात दोन धर्मात तेढ निर्माण झाले नाही. त्यामुळे या लोकांचा संताप वाढलेला आहे. अगदी वांद्र्याची घटना राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठरवून केलेली आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, राजकारण, मतभेद असू शकतात पण मतभेद अशाप्रकारे व्यक्त करणे, लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करत आहेत, यासाठी कोणी परकीय शक्ती तुम्हाला वापरून घेत आहे का?. तसेच सोनिया गांधी यांच्याबद्दल राजकीय मतभेद असू शकतात पण ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टिपण्णी केली जात आहे यामागे काहीतरी षडयंत्र शिजतेय. देशात सामाजिक विष पेरण्याचे काम केले जात आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा डाव दिसत आहे. लोकांनी संयम पाळणं गरजेचे आहे. कोरोनापेक्षा भयंकर हे विष असल्याचेही राऊत म्हटले. राजकारण, मतभेद असू शकतात पण मतभेद अशाप्रकारे व्यक्त करणे, लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करत आहेत, यासाठी कोणी परकीय शक्ती तुम्हाला वापरून घेत आहे का? अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली. तसेच एखादा गुन्हा घडतो तो सरकारच्या इशाऱ्यावर घडत नाही, उत्तर प्रदेशात जे घडलं तेव्हा योगी आदित्यनाथ यांना विचारुन झाले का? २ साधूंची हत्या झाली हे दुर्दैवी आहे. आधीच्या सरकारच्या काळात सामूहिक हत्या झाली तेव्हाही आम्ही राजकारण करु नये असे सांगत होतो आणि आत्ताही तेच सांगत आहोत, असेही राऊत म्हणाले.