चाळीसगाव, प्रतिनिधी । महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
देशभरात १ जूलै रोजी वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. मात्र गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाचा सावट असल्याने यावर्षी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. परंतु कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याने शासनाने टाळेबंदी उठवली आहे. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांनी राज्यस्तरीय महानायक वसंतरावजी नाईक गौरव पुरस्कार- २०२१ पुरस्काराचे आयोजन केले आहे. यासाठी विविध क्षेत्रातील जसे की, शिक्षक, कवी, साहित्यिक, कला, क्रिडा, आदर्श शेतकरी, आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव २३ जूनच्या अगोदर पाठविण्याचे आवाहन अशोक राठोड यांनी केले आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी खालील ९७३०३३४४१७ हा व्हाट्सअप क्रमांक देण्यात आले आहे.