वर्ध्यात दोन वेगवेगळ्या घटनेत पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू !

वर्धा (वृत्तसंस्था) वर्ध्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, बारा वर्षीय मुलगा आणि त्याचे आजोबा वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक घटना सोनेगाव (आष्टी) येथे शुक्रवारी रात्री तर, दुसरी घटना दुसरी घटना गोजी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

 

 

वर्ध्याच्या सोनेगाव (स्टेशन) शिवारात असलेल्या शेतातून कामे आटोपून घरी जात असताना पाऊस आला. ते बैलगाडीच्या साहाय्याने नाला पार करत होते. मात्र, अचानक बैल फसल्याने पाण्याच्या प्रवाहात दोन्ही महिला वाहून गेल्या. यावेळी इतरांनी धडपड करत कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. महिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली असता दोघींचेही मृतदेह उशिरा नाल्याच्या पुढील भागात आढळून आले. चंद्रकला लोटे आणि बेबी भोयर अशी मृतक महिलांची नावे आहेत. तर दुसरी घटना ही गोजी शिवारातील येरणगाव गोजी मार्गावरील नाल्यात घडली. धोत्रा येथून आजोबा आणि नातू बैलगाडी नेऊन देण्यासाठी सावली (सास्ताबाद) येथे जात होते. पण, पुलावर असलेल्या पाण्यात बैलगाडीसह आजोबा आणि नातू दोघेही वाहून गेले. नारायण पोहाणे असं या आजोबाचे हा त्यांच्या मुलीचा मुलाचे नाव मंगेश (१२) होते.

Protected Content