वयोवृध्दांना हेरून रोकड लांबविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पांडे चौकातील पोस्ट ऑफीस कार्यालयातून वृध्दाची पिशवी कापून एक लाख रूपयांची रोकड लांबविणाऱ्या दोन जणांना जिल्हापेठ पोलीसांनी गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी अटक केली आहे. ब्लेडने पिशवी कापून रोकड चोरून नेल्याची कबुली दोघांनी दिली आहे. याबाबत दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

अधिक माहिती अशी की, मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते काढले आहे. पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. गुरुवारी २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले होते. यावेळी नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून १ लाख रूपये काढले. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश दोघांनी ब्लेडच्या मदतीने पिशवील १ लाख रूपयांची रोकड लांबविली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र साबळे यांनी साध्या वेशात गस्तीवर असतांना सीसीटीव्हीच्या आधारे पोस्ट ऑफीस कार्यालयाच्या परिसरात संशयास्पद फिरतांना आढळून आले. त्यानुसार जिल्हापेठ पोलीसांनी सापळा रचून अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश यांना अटक केली. दोघांनी खाक्या दाखविताच अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

 

सपोनि राजेंद्र पवार, पोउनि गणेश देशमुख, पोहेकॉ सलीम तडवी, पोना जुबेर तडवी, पोकॉ अमितकुमार मराठे, रविंद्र साबळे यांनी कारवाई केली. दोन्ही संशयितांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content