रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्रा-मध्य प्रदेश सिमेवर वन विभागाच्या तपासणी नाक्याचे उद्घाटन यावल उप वन संरक्षक पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आले.
यामुळे विना पास अवैध लाकडांची तस्करी थांबणार आहे.
आधी वन तपासणी नाका रेल्वे उड्डान पुलच्या खाली असल्याने लाकुड तस्कर हुलकावणी देत असत. परंतु आता हे थांबणार आहे. नुकतेच नविन तपासणी नाक्याचे उद्घाटन संपन्न झाला.
यावेळी विजय गोटीवाले, गो-शाळा महाराज, विश्वम्बर पाटील, वनक्षेत्रपाल अजय बावणे, नाकेदार यशवंत पाटील, तत्कालीन वनक्षेत्रपाल मुकेश महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
तसेच वन अधिकारी पद्मनाभन यांच्या हस्ते वनमहोत्सव निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. या महामार्गावरुन विनापास मोठी लाकडांची तस्करी होते. याच्यावर नविन वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी लक्ष ठेवावे, अशी मागणी वृक्षप्रेमी मधुन होत आहे.