फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सनातन धर्मातील सर्व संप्रदायांच्या अमृत मंथनाचा समरसता महाकुंभ दि. २९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा समरसता महाकुंभ आयोजित करण्यामागे सात मुख्य हेतू आहेत. सतपंथ मंदिर संस्थान फैजपुरचा चतु:शताब्दी रौप्य महोत्सव, अखिल भारतीय संत संमेलन फैजपूरचा दशाब्दी महोत्सव, महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा साधूदीक्षा रौप्य महोत्सव, श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक दशाब्दी महोत्सव, परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांची २१ वी पुण्यतिथी, तुलसी हेल्थ केअर सेंटरचा लोकार्पण समारंभ आणि श्री जगन्नाथ गौशाला भूमिपूजनाचा समारंभ अशा सात कारणांच्या निमित्ताने हा समरसता महाकुंभ श्री निष्कलंकी नारायण भगवान यांच्या कृपाशीर्वादाने व सतपंथ मंदिराचे बारावे गादीपती महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे.