जळगाव प्रतिनिधी । उत्तमराव महाजन यांना खंडणी मागण्यासाठी डांबून ठेवण्याप्रकरणी पोलीस अधिकारी मनोज लोहार आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज येवले यांना आज न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याची घटना ३० जून २००९ रोजी चाळीसगाव येथे घडली होती. या प्रकरणी प्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. तर धीरज येवेल यांनी त्यांची मदत केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर १६ जानेवारी रोजी कोर्टाने तत्कालिन अप्पर पोलिस अधीक्षक आणि सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधिक्षक मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले होते. यानंतर आज या दोन्ही संशयितांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.