पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारी गावात १५ व्या वित्तच्या निधीतून सुरु असलेला गटारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून सदर बांधकाम तात्काळ थांबवावे अशी मागणी तक्रारी अर्जाच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्या बेबाबाई पाटील यांनी केली आहे.
तालुक्यातील लोहारी गावात १५ व्या वित्त निधीतुन आर.सी.सी. गटारीचे बांधकाम सुरु आहे. एकूण ९,५९,२१२/- (नऊ लाख , एकोनसाठ हजार, दोनशे बारा रुपये ) एवढे रक्कम या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र सदरचे काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असुन वाळु ही मातीमिश्रित व स्थानिक बहुळा नदीपात्रातुन आणलेली आहे. तसेच सदरचे काम हे लेव्हल मध्ये नाही. तसेच स्टील हे कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे. व खाली बेड कॉन्क्रीट न करता टाकता चालु आहे. तसेच संबधित कामाविषयी ग्रामविकास अधिकारी यांना लेखी व तोंडी हरकती घेतल्या. परंतु संबधित ठेकेदार व ग्राम विकास अधिकारी व सरपंच हे संगनमतांनी आर्थिक हित जोपासत संबंधित काम पुर्ण करण्याच्या तयारीत आहेत. या कामावर ग्रामपंचायत सदस्या बेबाबाई समाधान पाटील यांनी तीव्र हरकत घेतली आहे. संबधित बोगस काम करणा-या व त्या कामास आर्थिक हित जोपासत समर्थन करणा-या लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. दरम्यान यापुर्वी देखील संबंधित कामाविषयी ग्रामविकास अधिकरी यांचेकडे लेखी हरकत घेतली आहे. तरी सदरच्या पत्रावर आजपावेतो कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणुन व्यथीत होऊन बेबाबाई पाटील यांनी संबंधित विभागांना तक्रार केली आहे. संबंधित तक्रारीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती उचित कारवाई करण्यात यावी व कारवाई करतांना दिरंगाई करु नये, तसे न झाल्यास आम्ही आपल्या विरुध्द ही बाब वरीष्ठ कार्यालयास निर्दशनास आणुन देवु किंवा मा. न्यायालयात संबंधित विषयात न्याय मागु, संबंधित काम हे जनहिताचे असल्याने संबंधित अर्जाची प्राधान्याने चौकशी व्हावी. तसे न झाल्यास त्यास होणा-या सर्व परीणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. असेही बेबाबाई पाटील यांनी तक्रारी अर्जात नमूद केले आहे.
सदस्या बेबाबाई पाटील यांची मागणी पुढीलप्रमाणे
मौजे लोहारी गृप ग्राम पंचयायत येथे आर. सी. सी. गटार बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने ते तात्काळ थांबवुन चौकशी करावी. आणि चौकशीअंती निष्पन्न झाल्यास कायदेशीर कारवाई व्हावी, त्या ठेकेदाराला संबंधित निधी देण्यात येऊ नये, आजपावेतो झालेल्या बोगस बांधकामाला जबाबदार असणा-या सर्व लोंकावर आपल्या मार्फत कठोर कारवाई होऊन त्यांच्या विरुध्द गुन्हे नोंद करण्यात यावे, संबधित कामाविषयी आम्हाला तात्काळ अवगत करण्यात यावे, संबधित कामाला तात्काळ स्थगिती द्यावी. तक्रारी अर्जाच्या प्रति मुख्य कार्यकारी अभियंता, जि. प. जळगांव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जळगांव, गट विकास अधिकारी, पंचायत समिती पाचोरा व लेखा शाखा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि. प. जळगांव यांना पाठविण्यात आल्या आहेत.