पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्ताने परिसरातील युवक व युवतींसाठी लोहारा ग्रामस्थ, लोहारा परिसर, कासमपुरा, शहापुरा, म्हसास व रामेश्वर तांडा येथील ग्रामस्थांतर्फे २६ फेब्रुवारी रोजी वार – रविवारी सकाळी ७ वाजता ७ किलोमीटर व ४ किलोमीटर रनिंग अशा भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत खुला गट नं. १ मध्ये मुलांसाठी पहिले बक्षीस २१०० रुपये, दुसरे बक्षीस १५०० रुपये, तिसरे बक्षीस १००० रुपये, खुला गट नं. २ मध्ये मुलींसाठी अंतर ४ किलोमिटर धावणे स्पर्धेत पहिले बक्षीस ११०० रुपये, दुसरे बक्षीस ७५१ रुपये, तिसरे बक्षीस ५०१ रुपये, गट नं. ३ मध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी अंतर ४ किलोमीटर धावणे स्पर्धेत पहिले बक्षीस १००० रुपये, दुसरे बक्षीस ७०० रुपये, तिसरे बक्षीस ५०० रुपये या प्रमाणे विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांना फिटनेस सर्टिफिकेट, पायात बूट असणे आवश्यक आहे. या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेवु इच्छिणाऱ्यांनी दि. २५ फेब्रुवारी पर्यंत श्रीराम कलाल (मो. 8999560492 मो.9730108146) यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन, नियोजन व मार्गदर्शक शरद सोनार, लोहारा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सर्व सदस्य, लोहारा येथील दामोतबाई सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष युवराज पाटील, दादाश्री विश्व लाॅन्सचे डॉ. प्रितेश चौधरी (बंटीभाऊ), कासमपूरा ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश गवळी व सर्व सदस्य, पोलिस पाटील सुरेंद्र शेळके, शहापुरा ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश परदेशी व सर्व सदस्य, म्हसास ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर पोपट देवरे मा. सरपंच किसन पाटील व सर्व सदस्य, रामेश्वर तांडा ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तू राठोड व सर्व सदस्य. लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास चौधरी, सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी सर्व सदस्य, पिंटू राजपूत (कासमपुरा), डॉ.विकास पालीवाल, शेंदुर्णी येथील गीते डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ.महेंद्र गीते, लोहारा शहर पत्रकार मंचचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माणुसकी गृपचे गजानन क्षीरसागर, तालुक्यातील व परिसरातील प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार बांधव यांनी केले आहे.