जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लोणवाडी येथील ७० वर्षीय वृध्दाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे काल सायंकाळी आढळून आला होता. दरम्यान अनोळखी म्हणून अकस्मात एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोणवाडी येथील लहू कौतिक पाटील (वय-७०) या वृध्दाने मंगळवारी सकाळीच घर सोडले. संध्याकाळी पाच वाजता म्हसावद-बोरनार शिवारातील लोहमार्गावरील रुळावर त्यांचा एक धड नसलेला मृतदेह आढळून आला. मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलीसांनी ओळख पटविण्याचे कामलहू पाटील यांची परिस्थिती देखील जेमतेम होती. मुलगा अनिल हा सुरत येथे परिवारासह रहात होता. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने मुलगा परिवारासह घरी आला होता तर मोठा मुलगा भाऊसाहेब हा सासरवाडीला खांडवा, ता.मोताळा, जि.बुलडाणा येथे वास्तव्याला आहे. लोणवाडी येथे पत्नी सुशिलाबाई यांच्यासोबत ते वास्तव्याला होते.