रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश्यामध्ये सुरु केलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहचवावे, यासाठी भाजपातर्फे महासंपर्क अभियान राबविले जाणार आहे. पुढील महीनाभर भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी लोकांच्या घरापर्यंत पोहचण्याचे भाजपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिक्रीया, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी माध्यमांना दिली.
रावेर लोकसभा क्षेत्रातील मेळाव्या प्रसंगी उपस्थित भा.ज.पा प्रदेश सरचिटणीस तथा बूथ सशक्तीकरणाचे प्रदेश संयोजक विजय चौधरी,खा. रक्षाताई खडसे,बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फड़के यांच्या प्रमुख उपस्थीतीत महासंपर्क अभियानचा मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, शांताराम आबा पाटील, प्रदेश चिटणीस अजय भोले, भाजपा जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, माजी जि.प. अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, जळगाव जिल्हा प्रभारी अरुण मुंढे, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, शरद महाजन जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, गोविंद अग्रवाल, राकेश पाटील, लोकसभा संयोजक सुनिल पाटील, अतुल सरोदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, सारिकाताई चव्हाण, रेखाताई बोंडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपा तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी केले.